जालना विधानसभा बुथ कमिटीच्या मेळाव्याच्या पुर्वतयारीसाठी शनिवारी व्यापक बैठक जालना, प्रतिनिधी ः जालना विधानसभा बुथ कमिटी पदाधिकार्यांचा मेळावा आयोजीत करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या पुर्वतयारीसाठी दि. 06 ऑक्टोंबर शनिवार रोजी दुपारी 2 ः 30 वाजता सत्कार काँम्प्लेक्स अंबड रोड येथील जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयामध्ये काँग्रेस पक्षाचे नेते माजी आ. कैलास गोरंट्याल यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, प्रदेश काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, काँग्रेस पक्षाचे मान्यवर नेते उपस्थित राहणार आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे आणि नवनिर्वाचीत आमदार डॉ. वजाहत मिर्झा आणि महाराष्ट्र राज्य कमिटीचे अध्यक्ष हाजी इब्राहिम भाईजान आदी मान्यवरांचा दि. 14 ऑक्टोबर रोजी भव्य सत्कार आयोजीत करण्यात आला आहे. आणि जालना विधानसभा मतदार संघातील बुथ कमिटी पदाधिकार्यांचा मेळावा आयोजीत करण्यात आला आहे. या बैठकीस आजी - माजी नगरसेवक, जि. प., प. स. सदस्य, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, अल्पसंख्याक विभाग, सेवादल, अनुसूचित जाती सेल, कामगार आघाडी, ओबीसी सेल, शहर काँग्रेस कमिटी, तालुका काँग्रेस कमिटी आणि पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आवर्जुन उपस्थित राहावे असे आवाहन शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख, बुथ कमिटीचे अध्यक्ष विजय चौधरी, अ‍ॅड. राहुल हिवराळे, संजय शेजुळ, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष वसंत जाधव, गटनेते गणेश राऊत, राम सावंत, आलमखान पठाण, राजेंद्र राख, महाविर ढक्का, अ‍ॅड. संजय खडके, बदर चाऊस, दिनकर घेवंदे, विजय जर्हाड, सौ. विमलताई आगलावे, आनंद लोखंडे, विनोद यादव, शेख शमशु, देवराज डोंगरे, मोहन इंगळे, वैभव उगले, शिवराज जाधव, शेषराव जाधव, जावेद बेग, शेख सईद आदींनी केले आहे.