ऑक्धर्मवीर संभाजी प्राथमिक विद्यालयात मंगळवार,दि.२ ऑक्टोबर २०१८ रोजी ’राष्ट्रपिता महात्मा गांधी’ आणि ’लाल बाहादूर शास्त्री’ यांची जयंती उत्साहात साजरीटोबर २०१८ रोजी ’राष्ट्रपिता महात्मा गांधी’ आणि ’लाल बाहादूर शास्त्री’ यांची जयंती उत्साहात साजरी धर्मवीर संभाजी प्राथमिक विद्यालयात मंगळवार, दि.२ ऑक्टोबर २०१८ रोजी ’राष्ट्रपिता महात्मा गांधी’ आणि ’लाल बाहादूर शास्त्री’ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रमुख वक्ते श्री काळे सर यांनी ’राष्ट्रपिता महात्मा गांधी’ यांच्या जयंती प्रसंगी त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे भाषण सादर केले. त्यात प्रामुख्याने म.गाधी यांच्या पंचपदीची ओळख करून दिली तसेच त्यांच्या राजकीय प्रवासाबद्दल विस्तृत माहिती सांगितली. या प्रसंगी श्रीमती कांबळे मॅडम यांनी ’लाल बाहादूर शास्त्री’ यांचे कौटुंबिक जीवन, तसेच राजकीय प्रवास भाषणातून सांगितला. कयर्यक्रमाच्या अध्यक्षा मुख्याध्यापिका श्रीमती स्मिता खोतकर मॅडम यांनी दोनही महान व्यक्तीमत्वाचे गुणवर्णन केले. इ. तिसरी च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे विमोचन अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने या निमित्तीने वर्ग स्वच्छता, परिसर स्वच्छता अभियान घेऊन विशेष उल्लेखनिय कार्य करणा-या वर्गांना प्रथम, द्वितीय तसेच तृतीय बक्षीसे जाहीर करण्यात आली. तसेच ’गोवर रूबीला’लसीकरण मोहिमेअंतर्गत माहिती देणे, भाषण व निबंध स्पर्धा तसेच रांगोळी मेहेंदी स्पर्धा, कोलाज काम स्पर्धा इ.चे आयोजन-नियोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती लहाने मॅडम यांनी केले तसेच आभार प्रदर्शन श्रीमती साबळे मॅडम यांनी केले. या कार्यक्रमास मुख्याध्यापिका श्रीमती स्मिता खोतकर तसेच शाळेचे सर्व शिक्षकावृंद यांनी सहकार्य केले.