परतूर शहरा मध्ये नगरपालिकेचे पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले. चार दिवसा आड पाण्याचा पुरवठा. मुबलक पाणीसाठा असतानादेखील नगरपालिकेतर्फे पाणी सोडण्यास टाळाटाळ. नगराध्यक्षांचे दुर्लक्ष. परतूर शहरातील नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ शुद्ध पाणी मिळावे म्हणून महाराष्ट्र शासनाने पेयजल योजनेसाठी नवीन पाईपलाईन साठी परतूर नगरपालिकेस 50 कोटी रुपयांचा निधी दिला होता. या 50 कोटी मध्ये जलशुद्धीकरण केंद्र नवीन पाईप लाईन, येथील निम्न दुध्ना धरणातून पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मंजूर करून देण्यात आले होते, परंतु ही योजना कार्यान्वित होऊन सुद्धा एक वर्ष झालेला आहे. परंतु परतूर शहरातील नागरिकांना पीण्याचा स्वच्छ शुद्ध पाणी आता पर्यंत मिळालेले नाही, पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात असताना देखील, परतूर नगर परिषदचे कर्मचारी पिण्याचे पाणी सोडण्यासाठी हलगर्जीपणा करीत आहेत. व हाक नाक शहरातील नागरिकांना त्रास देऊन या कर्मचाऱ्यांनी पाण्याचा पुरवठा पाच दिवसाआड आपल्या मनमानी मर्जीने केलेले आहे, यासर्व बाबतीत नगरपालिकेच्या अध्यक्षांचे व नगरसेवकांचे सुद्धा दुर्लक्ष असून, नागरिकांच्या ज्या मुलभुत गरजा समस्यां संदर्भात नागरिकांच्या समस्या संदर्भात नगरसेवकांना काहीच देणे-घेणे नसल्याने, नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी त्रस्त झालेले आहे,तसेच परतूर शहरातील सर्व हात पंप बिघडलेले,नादुरूस्त आहेत, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा चार दिवसाआड होत असल्याने नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही नागरिक हैराण झालेले आहेत, परतुर शहराला लागूनच निम्न दुधना प्रकल्प असताना देखील व येथून संपूर्ण महाराष्ट्राला पाणीपुरवठा होईल एवढा पाण्याचा साठा उपलब्ध असताना, परतुर नगरपालिका पिण्याचा पाणी चार दिवसात सोडत आहेत, यासर्व बाबी संदर्भात नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना विचारले असता त्यांचे म्हण्णे आहे विज बिल मोठ्या प्रमाणात येत आहे म्हणून अध्यक्षांचे म्हणणे आहे की तीन दिवसाआड सुरू असलेला पाणि चार दिवसात करून टाका. यामुळे आम्ही चार दिवसाआड पाणी सोडत आहे, परतूर शहरातील नगरपालिकेच्या यामनमानी धोरणामुळे लोक त्रस्त झालेले आहेत, लोकांना पिण्यासाठी पाणी सुद्धा मुबलक प्रमाणात देण्यास नगरपालिका पूर्णतः अपयशी ठरलेली आहे, एकूणच सर्वच बाबतीत नगरपालिका नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहे, परतूर शहरातील नाल्यामध्ये भरमसाठ प्रमाणावर घाण पसरलेली आहे, नाल्या तुंबलेल्या आहेत पाणी रस्त्यावरून वाहत आहे, तरीदेखील नगरपालिकेच्या अध्यक्षांचे नगरसेवकांची याकडे दुर्लक्षच आहे, या घन कचऱ्यामुळे सर्वत्र शहरा मध्ये डासां मध्ये वाढ झालेली असून धूर फवारणी देखील शहरात कधीही झालेली दिसत नाही, नागरिकांचे म्हणणे आहे आमचं कोणी ऐकत नाही,नगरसेवक सुद्धा वार्डातील कामे करीत नाहीत, नगरपालिके मध्ये कायमस्वरूपी मुख्य अधिकारी नाहीत, यामुळे नगरपालिकेचे कर्मचारी मनमानी कारभार करीत आहेत, यासर्व बाबीकडे नगराध्यक्षांनी माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांनी लक्ष देण्याची गरज आहे, परंतु पालकमंत्र्यांच्या दबावा मुळे सुरेशकुमार जेथलियाची सर्व कामे बंद झालेली आहे, त्यांना नगरपालिकेत काहीही काम शिल्लक राहिलेल्या नाही, मग परतूर शहरातील जनता काय करणार आहे, या सर्व बाबतीत पालकमंत्र्यांनी सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे, नगरपालिकेचा कारभार परतूर शहरात मुख्याधिकारी विना सुरू असून, परतूर शहरात विना परवाना मोठ्या प्रमाणात बांधकामे होत आहेत, परवानगी नसतानाही शहरात बांधकाम सुरू आहेत, परतुर नगर पालिकेत मागील तीन ते चार महिन्यापासून मुख्याधिकारी नाही, गंगाधर इरलोड यांची अंबड येथे बदली झालेली आहे, व त्यांच्या जागेवर मुख्याधिकारी म्हणून चिंचाळकर हे रुजू झाले होते, त्यानंतर तात्पुरता पदभार मंठा येथील मुख्याधिकारी रहाटकर यांच्याकडे देण्यात आला होता, मात्र ते पालिकेत येत नाहीत आणि त्यांचा कोणाशी संपर्क ही होत नाही, यामुळे शहरात सध्या मोठा गोंधळ उडाला आहे कोण काय करतो याचा काहीच ताळमेळ राहिलेला नाही, शहरात परवानगी नसतानाही अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहेत, काही भागात अंधाराचे साम्राज्य पसरलेले आहे तर पाण्याचा प्रश्नही गंभीर बनलेला आहे, शहरात विकासकामे सुरू आहेत भूमिगत गटार योजनेचे काम सुरू असल्याने परतूर शहरात मोठ्या प्रमाणात रोड खराब झालेले आहेत, रस्ते खराब झालेले आहेत, रस्त्याची चाळणी पूर्णपणे झालेली आहे, रस्ते सुधारण्याची गरज आहे ज्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांना घर बांधायचे असेल तर त्यांना बँकेकडून कर्ज घ्यावे लागते त्या कर्मचार्‍यांना रीतसर बांधकाम परवानगी लागते, परवानगी शिवाय अशा शासकीय कर्मचाऱ्यांची फाईल पुढे सरकत नाही, मात्र पालिकेत परवानगीचा गोंधळ उडाल्याने नवीन घर बांधणारे कर्मचारीही अडचणीत आलेले आहेत, त्यामुळे पालिकेला मुख्याधिकारी देण्याची मागणी कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्याची मागणी नागरिक करीत आहेत, कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्यात यावे, नगराध्यक्ष विमलताई जेथलिया यांनी परतुर नगरपालिकेत कायमस्वरूपी मुख्याधिकारी द्यावा अशी मागणी केलेली आहे, यासंदर्भात नगराध्यक्षा विमल जेथलिया म्हणाल्या की नगरपालिकेस मुख्य अधिकारी नसल्याने नागरिकांची कामे मोठ्या प्रमाणात रखडली आहेत, कर्मचाऱ्यांवर कोणाचेही वचक राहिलेले नाही, सुरू असलेल्या कामावर नियंत्रण कोणी ठेवायचे, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यामुळे तात्काळ मुख्याधिकारी देण्यात यावा अशी मागणी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष विमलताई जेथलिया यांनी केली आहे.