पर्युषण महापर्व मोठया भक्तीभावाने साजरा औरंगाबाद प्रतिनिधी - श्री.खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पाश्श्र्वनाथ मंदिर राजाबाजार येथे गेल्या दहा दिवसांपासुन पर्युषण महापर्व मोठया उत्साहात संपन्न होत असुन प.पु.आचार्य विशुध्दसागरजी महाराज यांच्या उपस्थितीत दहा दिवसापासुन भगवंताचा इंद्र इंद्रानीचा मान मिळालेले सौ.उज्वला अशोक अजमेरा पंचायत सचिव यांचा खंडेलवाल दिगंबर जैन पंचायतच्या वतीने सन्मान पत्र,शाल,श्रीफळ देउâन अभिनंदन करण्यात आले.या प्रसंगी पंचायत अध्यक्ष ललीत पाटणी,सचिव अशोक अजमेरा,विश्श्वस्थ मंडळाचे एम.आर.बडजाते,किरण पहाडे,महेंद्र ठोले,डॉ.रमेश बडजाते,विनोद लोहाडे,नरेंद्र अजमेरा,जितेंद्र पहाडे,अशोक गंगवाल,सौ.काश्मीरा लोहाडे,निता ठोले यांच्यासह विश्श्वस्थ कार्यकारी मंडळ व चातुर्मास समिती समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. अशी माहिती प्रचार प्रसार संयोजक नरेंद्र अजमेरा व पियुष कासलीवाल यांनी एका पत्रकाव्दारे दिली.