मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची वार्षीक सर्वसाधारण सभा संपन्न औरंगाबाद- मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची वार्षीक सर्वसाधारण सभा दि.29.9.18 रोजी दुपारी 12.00 वा. मंडळाचे अध्यक्ष मा.श्री.प्रकाश सुंदरराव सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली रवींद्रनाथ टागोर सभागृह, देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद येथे संपन्न झाली.मा.अध्यक्षांच्या सूचनेनुसार मंडळाचे सरचिटणीस मा.आ.श्री.सतीश भानुदासराव चव्हाण यांनी सभेला सुरूवात केली. सभेच्या प्रारंभी भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न मा.अटलबिहारी वाजपेयी, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य मा.शंकर जिजाबा मगर, सदस्य श्री.विवेक जैस्वाल यांच्या मातोश्री कमलबाई लक्ष्मीनारायण जैस्वाल, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य मा.विजय पांडुरंग फलके यांचे चिरंजीव श्री.उदयसिंह फलके यांचे दु:खद निधन झाले. तसेच मराठा समाजास आरक्षण लागू करण्यासंदर्भात आंदोलनात मृत पावलेल्या व्यक्तींना आणि केरळ या राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मृत पावलेल्या व्यक्ती आणि संस्थेतील आजी माजी कर्मचारी यांचे दु:खद निधन झाले. त्या सर्वांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. या सभेला मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष मा.श्री.अमरसिंह पंडित, मा.श्री.शेख सलीम शेख अहमद, सहचिटणीस मा.श्री.अनिल नखाते, श्री.प्रभाकरराव पालोदकर, कोषाध्यक्ष डॉ.अविनाश येळीकर, कार्यकारणी सदस्य श्री.लक्ष्मणराव मनाळ, ऍड.मोहनराव सावंत, श्री.त्रिंबकराव पाथ‘ीकर, श्री.भारत सोळंके, श्री.आप्पासाहेब पाटील, श्री.विवेक भोसले, श्री.हेमंत जामकर, डॉ.प्रकाश भांडवलदार,श्री.विश्वास पाटील, श्री.दत्तात्रय पाटील, विजय सोळंके, श्री.भिमराव जाधव, श्री.कल्याण तुपे तसेच सदस्य श्री.पंडितराव हर्षे, श्री.अनिल पटेल, श्री.किसनराव देशमुख, ऍड.शशीकुमार चौधरी, ऍड.सुखदेव शेळके, श्री.व्दारकादास पाथ‘ीकर, श्री.भाऊसाहेब ठोंबरे, श्री.अर्जुनराव जोहर पाटील, डॉ.श्रीमती कानन येळीकर, यांच्यासह बहुसं‘येने मान्यवर सदस्य सभेला उपस्थित होते. या सभेमध्ये विषय पत्रिकेतील विषयावर चर्चा करण्यात आली. व बहुमताने ठराव समंत करण्यात आले. संस्थेच्या प्रगतीबाबत सविस्तर चर्चा झाली. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सर्वसाधारण सभा संपन्न झाली. सर्व पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य व संस्थेचे सर्व उपस्थित सदस्यांचे सहचिटणीस मा.श्री.अनिल नखाते यांनी आभार मानले व मा.अध्यक्षांच्या परवानगीने बैठक संपल्याचे जाहीर केले.