मराठा समाजाने तंत्रज्ञानाचा अंगीकार करून, नव-नव्या संधीचा शोध घेण्याची आवश्यकता, - पुरुषोत्तम खेडेकर. मराठा सेवा संघाचे संस्थापकअध्यक्ष पुरूषोतम खेडेकर यांनी परतूर येथे संवाद दौऱ्यात साधला संवाद, परतुर.-बदलत्या युगातील अनेक नव-नवीन आव्हाने व हे आव्हाने पेलण्यासाठी वर्षानु--वर्षाची जुनाट पद्धती, व विचारसरणीला चिकटून बसलेल्या मराठा समाजाला तंत्रज्ञानाचा अंगीकार करून नवीन संधीचा शोध घेण्याची गरज असल्याचे मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर यांनी सांगितले, मंगळवारी परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या सभागृहात संवाद दौऱ्यानिमित्त ते बोलत होते, यावेळी मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष अर्जुनराव तनपुरे, नाट्य लेखक राजकुमार तांगडे, आदीमंचावर उपस्थित होते, यावेळी बोलताना खेडेकर यांनी सांगितले की शेती व्यवसाय आता बट्ट्याबोळ व्यवसाय झालेला आहे, हे ओळखून तीनशे वर्षांपूर्वी ज्यांनी शेती सोडून उद्योग धंद्याकडे आपले लक्ष केंद्रित केले,तो समाज आज घडीला आर्थिक,आणि सामाजिक दृष्ट्या प्रगत असल्याचे पहावयास मिळत आहे, मराठा समाज मात्र कायम तोट्यात असणाऱ्या शेती व्यवसायाला चिकटून बसलेलाच आहे, विशेषतः तरुणांनी याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले,सद्ध्या जगात बदलत असलेले वातावरण,व युवक वर्गा समोरील आव्हाने, आणि संधी,मराठा--कुणबी- समन्वय, महिला - मुली यांच्या सामाजिक समस्या, त्यावरील उपाय योजना, मराठा आरक्षण वस्तुस्थिती, आदी विषयांवर त्यांनी यावेळी समाज बांधवांशी मुक्तपणे संवाद साधला, यावेळी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष, प्राध्यापक पांडुरंग नवल, विनायक भिसे, अशोक तनपुरे, प्रभाकर नळगे, नामदेवराव धुमाळ, केशव बरकुले, एकनाथराव कदम, प्राध्यापक संभाजी तिडके, श्याम बरकुले, संदीप जगताप, कैलास शेळके, नवनाथ तनपुरे, डॉक्टर प्रशांत अंभोरे, शंकर थोटे, प्राध्यापक बालासाहेब मुजमुले, आदींची यावेळी उपस्थिती होती, - ग्रामीण भागात जनजागृतीची गरज. साहित्य, मनोरंजन, व्यापार, क्षेत्रात आपला वाटा वाढविण्यासाठी, शिक्षित समाज बांधवांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून महाराष्ट्रात, दरवर्षी कोट्यावधी रुपयाचा चुराडा केला जात आहे,जर हाच पैसा सामाजिक सुधारणांसाठी वापरल्यास मोठा सामाजिक बदल घडवण्यात वाटा मिळू शकतो, ग्रामीण भागात याबाबत जनजागृती होणे गरजेचे असल्याचे मत यावेळी बोलताना मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरूषोतम खेडेकर यांनी सांगितले.